आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अपघातामध्ये भाचा झाला ठार, मामा जखमी‎

जालना8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंटेनरने दुचाकीला धडक‎ दिल्याने एक सहा वर्षाचा भाचा ठार, तर‎ मामा जखमी झाले. ही घटना मंगळवारी‎ सिंदखेडराजा रोडवरील धारकल्याणजवळ‎ घडली. स्वप्निल तेजराव बर्डे असे मृत‎ मुलाचे, तर राजू रंगनाथ वाहूळ (रा. दोघेही‎ कडवंची) असे जखमीचे नाव आहे. हे‎ दोघेही नात्याने मामा-भाचे आहेत. याप्रकरणी‎ वाहूळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे.

हे दोघे सदानंद महाराज यांचे दर्शन‎ घेऊन गावाकडे परतत होते. परंतु, या‎ रस्त्यावर कंटेनरने धडक दिली. याप्रकरणी‎ कंटेनर (एमएच १२ ४७२०) याच्या‎ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे. या तपास जारवाल हे करीत आहेत‎

बातम्या आणखी आहेत...