आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, पाणी, वीज, रोजगार, पायाभूत सुविधा, कृषी, आयकर, बँकिंग -फायनान्स, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, घरे अशा विविध मुद्द्यांवर लक्ष दिले आहे. तसेच गरिबांसाठी मोफत रेशन वाटपास एक वर्षाची मुदवाढ, कारागिरांसाठी विश्वकर्मा कौशल सन्मान पॅकेज, आदिवासींसाठी १५ हजार कोटींची योजना, शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारणे, मिलेट्ससाठी ग्लोबल हब बनवण्याचे मिशन, पर्यटन वाढीस चालना, लघु-मध्यम उद्योगांना आर्थिक मदत असे बहुआयामी मुद्दे मांडले असून त्याचे जालनेकरांनी स्वागत केले. मात्र, काही बाबी दिशाभूल करणाऱ्या असल्यामुळे संतप्त प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत.
संतुलित व सुरक्षित अर्थसंकल्प
अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना केंद्रस्थानी ठेवण्यासोबतच टॅक्स लॅब मध्ये सूट देण्यात आली आहे. १५७ नर्सिंग कॉलेज उघडण्याची घोषणा तसेच सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन मिशन जाहीर करण्यात आले आहे. तरीही सार्वजनिक आरोग्यासाठी आणखी तरतूद करणे अपेक्षित होते. महिला सन्मान बचत पत्र ही महिलांसाठी चांगली बाब असणार आहे. - डॉ. अर्चना काबरा , संचालक, श्रीकृष्ण हॉस्पिटल
कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणारी आयकर प्रणाली
केंद्रीय अर्थसंकल्पात कर्मचाऱ्यांच्या तोंडाला केवळ पाने पुसण्यात आली अाहेत. ७ लाखांपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना कोणताही आयकर लागणार नसला तरी ७ लाख एक रुपये उत्पन्न असणाऱ्या कर्मचाऱ्यास जवळपास २५ हजार रुपये आयकर भरावा लागणार आहे. त्यामुळे ही आयकर प्रणाली कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणारी आहे. - गजानन वाळके , शिक्षक
कृषी पर्यटनावर दिलेले लक्ष दखल घेण्यासारखे
कृषी पर्यटन, हरित खेती, कृषी सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा यासारख्या बाबींवर दिलेले लक्ष दखल घेण्यासारखे आहे. बाजरी, ज्वारी, रागीसारख्या भरड धान्याला दिले जाणारे प्राधान्य, रोपवाटिका आदींसाठी २२०० कोटी, मत्स्य योजनेसाठी ६ हजार कोटी, सहकारी बँकांचे संगणकीकरण, २० लाख कोटी रुपयांचे कृषी कर्ज आदी बाबी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहेत. - संजय मोरे , शेतकरी, नळविहिरा, ता. जाफराबाद
स्टील उद्योगासाठी सुवर्णकाळ
१५ वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने भंगारात काढली जाणार असल्यामुळे कारखान्यांना मुबलक प्रमाणात भंगार उपलब्ध होईल. त्यामुळे येणारा काळ स्टील उद्योगासाठी सुवर्णकाळ असेल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा खर्चही ६६ टक्क्यांनी वाढवून ७९ हजार कोटींपर्यंत जाईल . यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या स्टील, सिमेंट आदी उद्योगांना चांगले दिवस येतील. -नितीन काबरा, संचालक, भाग्यलक्ष्मी रि-रोलिंग मिल, जालना
नवीन दिशा देणारा अर्थसंकल्प
नवीन आयकर प्रणालीमध्ये ७ लाखांपर्यंत आयकर नाही. ३ ते ६ लाखांवर ५ टक्के, ६ ते ९ लाखांवर १० टक्के, ९ ते १२ लाखांपर्यंत १५ टक्के, १२ ते १५ लाखांवर २० टक्के व १५ लाखांपेक्षा अधिक असल्यास ३० टक्के कर लागणार आहे. परंतु यात कलम ८० सी अंतर्गत येणारे एलआयसी, पीपीएफ व कलम ८० डी अंतर्गत येणारे मेडिक्लेम म्हणजेच चॅप्टर ६ ए च्या वजावटी मिळणार नाहीत. यामुळे नागरिकांचा कल बचतीकडे राहणार नाही . - गोविंदप्रसाद मुंदडा , सीए,
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.