आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या सत्कारातून आयुष्याला नवी ऊर्जा‎

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎शालेय शिक्षणासोबतच‎ विद्यार्थ्यांच्या पुढील जीवनाला‎ आकार देण्याचे कार्य शिक्षक एका‎ सिमीत वयापर्यंत करीत असतो.‎ विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रात गेले तरी‎ जीवनात यशस्वी व्हावे, असेच‎ शिक्षकांना वाटत असते. मात्र,‎ आई-वडीलांचे परिश्रम,‎ मिळालेल्या संधी, त्यांचे कर्तृत्व व‎ निर्णय क्षमतेमुळे विद्यार्थी जीवनात‎ यशस्वी होतात. आज आपले‎ विद्यार्थी विविध ठिकाणी‎ यशस्वीपणे कार्यरत असल्याचे‎ बघून आणि जुन्या आठवणींना‎ उजाळा देत शिक्षकांचा सन्मान‎ सोहळा हा आनंदोत्सव सर्व‎ शिक्षकांना नवी उर्जा देणारा‎ असल्याचे न्यु हायस्कूलचे माजी‎ शिक्षक आर. एन. शेख यांनी सांगितले.‎

भोकरदन शहरातील न्यु‎ हायस्कूल प्रांगणात सन २००१-०२‎ मध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या ‎विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या स्नेहमिलन आणि गुरुवर्य कृतज्ञता ‎ ‎ सन्मान सोहळ्यात शेख बोलत‎ होते. यावेळी सत्कारमूर्ती शिक्षक‎ बी. आर. खेडकर, एस. बी.‎ आराक, ए. बी. सहाने, ए. पी. वाघ, ‎ ‎ टी. एन. महाजन, ए. डी. दहीजे,‎ एस. बी. लिपणे आदींची उपस्थिती होती. शेख म्हणाले,‎ मराठवाड्यातील व इतर‎ परिसरातील ग्रामीण भागातील‎ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे‎ या हेतूने महाराष्ट्र राज्याचे माजी‎ मंत्री कै.विनायकराव पाटील यांनी‎ पुढाकार घेऊन १ सप्टेंबर १९५८ मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक‎ मंडळाची स्थापना करुन‎ परिश्रमपूर्वक रोवलेले हे संस्थेचे‎ रोपटे आता बहरले आहे. या‎ विद्यालयाचे माजी विद्यार्थी विविध‎ क्षेत्रात यशस्वी झाले असून हा‎ शाळेचा अभिमान आहे.

मागील २०‎ वर्षानंतर झालेले आपल्या सहकारी‎ मित्रांचे स्नेहमिलन आल्हाददायक‎ असून पुढील आयुष्य अधिक सुखमय जाण्यासाठी मित्रांचा हा‎ गोतावळा एक नवा आयाम ठरेल,‎ असा विश्वास व्यक्त केला. यावेळी‎ शिक्षकांचा शाल, श्रीफळ,‎ स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देवून सत्कार‎ करण्यात आला. यावेळी‎ विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना‎ उजाळा देत विविध खेळ,‎ सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.‎ प्रास्ताविक समाधान जाधव यांनी‎ केले.

सूत्रसंचालन बबन तळेकर‎ यांनी तर देविदास जाधव यांनी‎ आभार मानले. यावेळी रावसाहेब‎ कोरडे, अमर देशमुख, शंकर‎ राजपूत, मयूर थारेवाल, निलेश‎ जैस्वाल, जितेंद्र भंसाली, सुनील‎ पिसे, अमित खुळे, निलेश तळेकर,‎ विनोद जेठे, वैशाली शिंदे , दीपा‎ बोर्डे, डाॅ. प्रशांत बावस्कर,‎ भाऊसाहेब सोनवणे, इम्रान खान,‎ विनायक सोनवणे, सुनील तळेकर,‎ गोपीनाथ तळेकर, विश्वनाथ‎ तळेकर, संतोष जंजाळ, प्रतिक्षेत‎ धायतडक, विनोद मुंडे आदी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...