आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायस्कूल:विनायकराव पाटील स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा  स्पर्धेत न्यू हायस्कूल वरूड बुद्रुकची बाजी

वरूड बुद्रुकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन येथील न्यू हायस्कूलमध्ये कै. विनायकरावजी पाटील स्मृतिप्रित्यर्थ आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १७ वयोगट मुले या क्रीडा प्रकारातील कबड्डीत जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील न्यू हायस्कूलने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला. विजेते खेळाडू विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी खेळण्यास पात्र झाले आहे.

या खेळाडूंमध्ये शुभम काळे, प्रथमेश काळे, शिवशंकर मोरे, तुषार रक्ताडे, आकाश बकाल, जीवन शिंदे, शिवशंकर सुद्रिक, ऋषिकेश जोहरे, गौरव परिहार, विठ्ठल परिहार यांचा सहभाग होता. तसेच १०० मीटर धावणे या प्रकारामध्ये पूजा दत्ता कर्डिले आणि लांब उडी मध्ये तृप्ती ज्ञानेश्वर जाधव घेणे प्रथम क्रमांक फटकावला. या सर्व खेळाडूंचे प्राचार्य फसले, व्ही.ए. पाटील, मुख्याध्यापक एस. डी. जोशी, एस. डी. वैराळ, ए. एस. भोपळे, आर. एस. गाढवे, पी. बी. मलीये, शेवत्रे, जी. एम. कन्नेवार, बी.के. भोकरे, सुरडकर, व्ही. जी. सुसर, पी एस घोडके, देशमुख आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...