आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारली बाजी:तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत न्यू हायस्कूलने मारली बाजी

वरुड बुद्रुकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे १३ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेस प्रतिसाद मिळाला. यात न्यू हायस्कूल वरुड घायवट या शाळेच्या विद्यार्थ्यांनी सरावाच्या बळावर विविध मैदानी स्पर्धा प्रकारात बाजी मारली. यामध्ये १४ वयोगट मुलीमधून अंकिता भेलके हिने २०० मीटर धावणे आणि लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

१७ वर्षे आतील वयोगट मुलांमधून ऋषिकेश वानखेडे याने लांब उडीत प्रथम क्रमांक पटकावला. ३००० मीटर धावणे प्रकारामध्ये समाधान बकाल यांने द्वितीय तर महेश बाजीराव बकाल यांने तृतीय क्रमांक पटकावला. मुली मधून पूजा दत्ता करडेल हिने ४०० मीटर धावणे तसेच लांब उडी प्रकारामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तृप्ती ज्ञानेश्वर जाधव हिने २०० तसेच मीटर धावणे आणि लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत. याबद्दल त्यांचे गटशिक्षणाधिकारी भरत वानखेडे, तालुका क्रीडा संयोजक प्रा. वाहेद पटेल, मुख्याध्यापक एस. डी. जोशी, एस. डी. वैराळ, ए. एस भोपळे, आर एस. गाढवे, पी. बी. मलीये, ई. ए. शेवत्रे, बी. के. भोकरे, ए. सी. सुरडकर, व्ही. जी. सुसर, पी. एस. घोडके, आर. आर. देशमुख आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...