आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:मैदानी स्पर्धेत न्यू हायस्कूलचे यश

जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील न्यू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विविध प्रकारात यश मिळवून तालुक्यात प्रथमस्थान पटकावले असून या खेळाडूंचीजिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

किर्ती म्हस्के या विद्यार्थीनीने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तालुक्यातुन प्रथम, वैशाली सरोदे हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, ऋतुजा देवढे हिने ४०० धावुन तालुक्यातुन प्रथम क्रमांक, साक्षी देवढे हिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम, कुणाल पंडित ४०० मीटरमध्ये प्रथम, अक्षय गाढवे हा विद्यार्थी लांब उडीत तालुक्यातुन प्रथम, वैशाली सरोदे हिने लांब उडीत प्रथम, तर रिले-१००मीटर ४०० मीटरमध्ये मेघा गोमलाडू, साक्षी देवढे, भावना जाधव, प्रियंका दांडगे, आरती शिंदे यांनी यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष दादासाहेब म्हस्के, राहूल म्हस्के, गटशिक्षणाधिकारी डॉ. वानखेडे, प्रा. पटेल, बोरकर आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...