आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्याबाहेर बदली:बीड पोलिस दलात येणार नवे अधिकारी, पीएसआयच्या बदल्या

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला १४ डिसेंबरपासून सुरुवात झाली. विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मलिकार्जुन प्रसन्ना यांनी पीआय, एपीआय आणि पीएसआय यांचे बदली आदेश जारी केले जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे.

बीड जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक तथा सायबर सेलचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांची उस्मानाबाद येथे प्रशासकीय बदली झाली आहे. याबरोबरच पोलिस निरीक्षक शेषेराव उदार यांची औरंगाबाद ग्रामीण तर जिल्हा वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक भागवत फुंदे यांची जालना येथे बदली झाली आहे. यापूर्वी बीड ग्रामीण ठाण्याचे प्रमुख म्हणून काम पाहिलेले शितलकुमार बल्लाळ यांची जालना येथून पुन्हा एकदा बीड येथे बदली झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...