आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत निवडणूक आयोगाने वर्षातून चार वेळा नवमतदारांना नाव नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. यामुळे राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साध्य होण्यासाठी व लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी नवमतदारांनी मतदार नोंदणी अवश्य करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी केले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नेटके म्हणाले, सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वयाची १८ वर्षे पूर्ण होताच आपले नाव मतदार यादीत नोंदवावे. निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन व ऑफलाईन हे दोन्ही पर्याय ठेवले आहेत. आपणास अनुरुप अशा कोणत्याही प्रकारे आपली नोंदणी करु शकता.
या वर्षाची थीम मतदाना इतके अमूल्य नसे काही, बजावू हमखास मताधिकार आम्ही हे असल्याचेही त्यांनी सांगितले. दिव्यांग आयकॉन निकेश मदारे म्हणाले, भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. मतदानाच्या प्रक्रियेत सर्वांना सामील होता यावे या भावनेतून निवडणूक आयोगाने दिव्यांगाना नोंदणीपासून ते मतदान करेपर्यंत उपयुक्त अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.
देशात मतदानाचा टक्का दिवसेंदिवस वाढत चालला असून, प्रत्येकाने नावनोंदणी करुन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित निबंध लेखन, रांगोळी, घोषवाक्य, चित्रकला स्पर्धेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.