आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नवीन मतदारांनी नोंदणी करण्याचे केले आवाहन

सिंधीकाळेगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य निवडणूक आयोगामार्फत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता नव्याने मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सुरू करण्यात आले असुन ज्या युवक-युवतींचे वय १ जानेवारी २०२२ पर्यंत १८ वर्ष पुर्ण झाले आहे त्यांनी मतदार यादित नविन नावे नोंदवावेत तसेच नाव, पत्ता, यांची दुरुस्ती व ज्यांचे नाव कमी करायचे आहे ते नावे कमी करता येईल असे अवाहन सोनदेव धाराचे सरपंच गजानन ढाकणे यांनी केले आहे.

ज्यांचे नाव नव्याने मतदार यादित नोंदवायचे आहे त्यांनी नमुना क्रमांक ६ चा फॉर्म भरावा. या साठी वयाच्या पुराव्यासाठी टिसी, आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र २ पासपोर्ट फोटो, कुटुंबातील सदस्याचा नातेवाईकांचा मतदानाचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. ज्यांना मतदार यादितुन आपले नाव कमी करायचे आहे त्यांनी नमुना क्रमांक ७ हा फॉर्म भरावा. ज्यांना नाव व पत्याची दुरूस्त करायची आहे त्यांनी नमुना क्रमांक ८ चा फॉर्म भरून बीएलओ यांच्या कडे व तहसील कार्यालय दाखल करावेत. आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आपले नाव नविन मतदार यादित नक्कीच समाविष्ट करून घ्यावेत असे आवाहान सरपंच गजानन ढाकणे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...