आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्त:गावात पोलिसांची रात्रीची गस्त वाढवणार

कुंभार पिंपळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या कुंभार पिंपळगावात रात्रीची गस्त वाढवून आठवडी बाजारात चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे घनसावंगी पेालिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी सांगितले.

कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ सह परिसरातील चोऱ्या, दरोडे गोळीबार अशा प्रकारच्या अनेक गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याचे पाहण्यास मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी महासंघाची बैठक घेेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय कंटुले, ओमप्रकाश लोया, अजीम खान पठाण, शिवाजी कंटुले, भास्करराव कंटूले, नरेंद्र जोगड, किशोर शिंदे, कौतिक घुमरे आदींची उपस्थिती होती. यावेळी विविध विषयावर व्यापारी व पोलिस प्रशासन यांच्यात खबरदारी, दक्षता, सुरक्षितता याबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली.

आठवडी बाजारात येणाऱ्या भुसारमालांचे व्यापारी व इतर पशुधन विक्रीसाठीयेणारे व्यापारी व शेतकरी यांना बाजार समितीच्या वतीने सुविधा, सुरक्षितता, दक्षता घेण्यात यावी. त्यामध्ये सर्वप्रथम बाजार समितीने व्यवसायासाठी आलेल्या भुसारमालांच्या व्यापाऱ्याला जागेची साफसफाई करून देणे, व्यापाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय ,पशुधन विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांना सुव्यवस्थितीत जागा उपलब्ध करून देणे, जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय, सुरक्षितता शिस्त व बाजार समितीने वॉचमन बाजारच्या दिवशी दोन-तीन सुरक्षा रक्षक ठेवून बाजार समितीने व्यापाऱ्यांना मदत करावी.

बातम्या आणखी आहेत...