आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लबचा पुढाकार:टीबीमुक्त भारतसाठी घेतली जाणार निक्षय मित्रांची मदत

जालना10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यासाठी निक्षय मित्रांची मदत घेतली जाणार आहे. जालना जिल्ह्यातील विविध उद्योगसमूह, सामाजिक संस्था, क्लब, कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी होण्यास इच्छुक असून दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत टीबीमुक्त भारतासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही देण्यात आली.

क्षयरुग्णांना सामुदायिक साहाय्य मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत उपक्रमांतर्गत निक्षय मित्र कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंट हा उपक्रम हाती घेतला आहे. यात रुग्णांचे उपचार यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी उपचारांवरील रुग्णांना अतिरिक्त मदत देऊन त्यांना उपचाराशी जुळवून ठेवणे हा यामागील उद्देश आहे. याद्वारे व्यक्ती व सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवण्यास मदत होईल व क्षयरोगाशी संबंधित समाजातील भीती जनजागृतीद्वरे कमी होईल. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आयोजित बैठकीत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अश्वमेघ जगताप, अतिरिक्त जिल्हा अारोग्य अधिकारी डॉ. इराणी, डॉ. राम देशमुख तसेच उद्योजक समीर अग्रवाल, एस. ए. सुब्बाराव, सुनील रायठठ्ठा, गिरीश गिंदोडिया, यश बगडिया, सागर दक्षिणी, श्रीकांत दाडआदी उपस्थित होते.

१६१८ रुग्णांवर उपचार
जिल्ह्यात १६१८ क्षयरुग्ण औषधोपचार घेत आहे. रुग्णांना पोषण आहार व आवश्यक इतर मदत देण्याबाबत उद्योजक, क्लब व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संमती दर्शवली.