आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षित:वन परिसरातून भरकटलेले नीलगायीचे वासरू कुत्र्यांपासून केले संरक्षित

पिंपळगाव रेणुकाई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव रेणुकाई परिसरात वन्यप्राण्याचा संचार अधिक असल्याने या ठिकाणी हे वन्य प्राणी शेत परिसरातील नाल्यांमध्ये पाणी पिण्यासाठी येतात. सध्या रब्बी पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू असून शेतकऱ्यांचे शेतात पाणी देणे सुरू आहे.

यामुळे वन्यप्राणी हे शेतातून ये-जा करतात. अशातच अचानक कुत्रे मागे लागल्याने वन गाईचे वासरू हे पळत असल्याचे संदीप देशमुख या शेतकऱ्याला दिसून आले. मात्र, पळताना जमीन ओली असल्याने पाय जमिनीत फसल्याने कुत्र्यांनी या वासरावर झडप मारताच वासराने आरडाओरडा सुरू केला. सदर वासराचा आवाज शेतात काम करीत असलेले संदीप देशमुख व त्यांचे शेजारी शंकर देशमुख या दोघांनी ऐकताच लगेच त्यांनी धाव घेऊन त्या नीलगायच्या वासराला कुत्र्याच्या तावडीतून वाचवत जीवदान दिले.

बातम्या आणखी आहेत...