आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रॉन्झ मेडल:नऊ गोल्डमेडल, 13 सिल्वर तर सहा ब्रॉन्झ मेडलचे मानकरी

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकार मान्यताप्राप्त १३ वी राज्यस्तरीय कुडो स्पर्धेत जालना जिल्हाची जालना कुडो अकॅडमी ने राज्यस्तरीय स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रात सेकंड क्रमांक पटकावला तसेच जालना कुडो अकॅडमी ने जालना जिल्ह्याचे नाव रोशन करून त्या मध्ये एकूण २८ पैकी २८ कुडो फायटर यांनी २८ मेडल मारून जालना जिल्हा गाजवला.

यामध्ये गोल्डमेडल ९, सिल्वर मेडल १३, ब्रॉन्झ मेडल ६ असे असे मेडल जिंकुन जिल्ह्याचे नाव चमकवले. १३ व्या कुडो राज्यस्तरीय स्पर्धेत जालना चमकला यानिमित्त कुडो भारताचे अध्यक्ष हंशी मेहुल वोरा, महाराष्ट्र राज्याचे जनरल सचिव शिहान जस्मिन माकवाना, कुडो खनीजदार महाराष्ट्र राज्य राजेश सोनले सर यांनी कुडो फायटर यांना ट्रॉफी, मेडल्स, व सर्टिफिकेट देऊन कुडो फायटर चे गौरव करण्यात आले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या यासाठी मुलांना घडविण्याचे काम कुडो फाउंडेशन जालना चे सचिव दत्ता पवार, अनिल भुतेकर, धीरज गुप्ता, अभिषेक उदेवाल, सुमित, गौरव, तसेच यांचा गारव झाला.

बातम्या आणखी आहेत...