आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:मत्स्योदरी अभियांत्रिकीच्या नऊ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी टेक्नॉलॉजीमध्ये निवड

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातून कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग, मेकॅनिकल इंजिनीरिंग, सिविल इंजिनीरिंग व इलेक्ट्रिकल इंजिनीरिंग या शाखेतून उत्तीर्ण झालेल्या ९ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्विसेस इंडिया लिमिटेड, पुणे या कंपनी मध्ये फ्रेंड्स युनिअन एनर्जींग लाइव्हस (फ्युएल) च्या ट्रेनिंग मार्फत ४.२ लाख प्रति वर्ष या पॅकेज वर निवड करण्यात आली आहे.

या मध्ये योगेश पौळ, दीपक साखरे, अभिषेक टाकळकर, कल्याणी शर्मा, मानसी कुलकर्णी, वैष्णवी खांडेभराड, अनिमेश पांडव, प्रल्हाद शेडगे, चैतन्य अंभोरे यांचा समावेश आहे. मागील शैक्षणिक वर्षांमध्ये महाविद्यालयाचा फ्युएल ट्रैनिंग इन्स्टिटयूट आणि कॅपजेमिनी कंपनी सोबत करार करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व मंत्री राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. बिरादार, उपप्राचार्य प्रा. रवींद्र करवंदे, शाम भोजने, सर्व विभाग प्रमुख, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. स्वप्नील ढोले अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...