आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदोन्नती:जिल्हा पोलिस दलातील नऊ जणांना मिळाली पदोन्नती ; पोलिस अधीक्षक यांचा आदेश

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच पोलिस हवालदरांना सहाय्यक फौजदार तर चार पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार यांना पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी आदेश काढले आहेत.पोलिस हवालदार संजय गवळी, मनोहर खंडागळे, नारायण डोंगरे, रेवानंद चतुर्वेदी, सुभाष चेके यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक गजू भोसले, कदीम ठाण्याच्या ज्योती पालवे, शेख इस्माईल शेख इब्राहिम, भरत काळे यांना पोलिस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांनी आज जिल्हा पोलीस दलातील नऊ पोलिस कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्याचे आदेश काढले आहेत. पदोन्नती मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दरम्यान, वरिष्ठांनी पदोन्नतीचे आदेश काढले. आदेश पाहिल्यानंतर काम करण्याची एक प्रकारे ऊर्जा मिळते. पोलीस मुख्यालय, स्थानिक गुन्हे शाखा,अंबड, दरोडा प्रतिबंधक पथकात यापूर्वी काम केले सध्या आर्थीक गुन्हे शाखेतही अनेक विनंतीला आरोपी पकडण्यासाठी वरिष्ठ व सहकार्यांसोबत मेहनत घेतली असल्याचे गजू भोसले म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...