आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बावणेपांगरी, दाभाडी, रोशनगाव मंडळात मदत नाही; संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको

बदनापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील बावणेपांगरी, दाभाडी, रोशनगाव महसूल मंडळात सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ महिन्यात अतिवृष्टी व पूर्व परिसर माहितीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे आतोनात नुकसान झालेले असताना आणि कृषिमंत्र्यांनी रोशनगाव मंडळात स्वतः भेट देऊन पाहणीही केेली. तरीदेखील राज्य सरकारने नुकसान भरपाईपासून वंचित ठेवल्याने ५ डिसेंबर रोजी औरंगाबाद जालना महामार्ग रस्त्यावर बदनापूर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी भेट देऊन निधी प्राप्त होताच वाटप केले जाईल व शासनास आपल्या मागण्या कळवण्यात आल्या असून पुन्हा अहवाल पाठविला जाईल असे अश्वासन दिले. यावेळी सरकराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ या महिन्यात बदनापूर तालुक्यासह सर्वत्र अतिवृष्टी झाली तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतकऱ्यांचे फळबागा व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असता नुकसान भरपाई मिळावी म्हणून विरोधी पक्ष व शेतकऱ्यांना प्रशासनाकडे मागणी केली असता राज्यसरकारने अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यावेळी बदनापूर तालुक्यात बदनापूर,शेलगाव,बावणेपांगरी,दाभाडी,रोशनगाव सर्व महसुल मंडळात अतिवृष्टीचा फटका बसला व शेतकऱ्यांच्या फळबागा व पिकांचे नुकसान झाले दरम्यान राज्याचे कृषी मंत्र सातारा अब्दुल यांनी रोशनगाव मंडळात स्वतः भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे अश्वासन दिले मात्र ज्यावेलो शासनाकडून अनुदान जाहीर करण्यात आले असता त्यामध्ये रोशनगाव,दाभाडी व बावणेपांगरी मंडळाला वगळण्यात आल्याचे दिसून आल्याने शेतकऱ्यांनी १ डिसेंबर रोजी बदनापूर तहसीलदार रमेश मुंडलोड यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

शेतकऱ्यांनी निवेदन देऊन देखील कारवाई नझाल्याने ५ डिसेंबर रोजी औरंगाबाद जालना महामार्ग रस्त्यावर बदनापूर तहसील कार्यालयासमोर दुपारी १ वाजत रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णतः खोळंबली होती. दोन किलो मीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या दरम्यान बदनापूरचे तहसीलदार रमेश मुंडलोड, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी रास्ता रोको आंदोलनच्या ठिकाणी भेट देऊन आणखी निधी प्राप्त झळा नाही होताच वाटप केले जाईल.

तसेच शेतकरी व आंदोलनकर्त्यांना विंनती करीत आपल्या मागण्या शासनाला कळविण्यात आलेल्या आहे. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जालना जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब वाकुळणीकर, बबलू चौधरी, राधाकिसन शिंदे, राम सिरसाठ, नंदकिशोर दाभाडे, रवीकुमार बोचरे,अंकुश शिंदे, महेमूद बेग यांच्यासह अनेक शेतकऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुक्यासाठी निधीची गरज
बदनापूर तालुक्यातील रोशनगाव, दाभाडी, बावणेपांगरी महसूल मंडळात अतिवृष्टी मुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले आहे. परंतु शासनाकडून अपुरा निधी उपलब्ध झाल्याने तिन्ही मंडळांतील शेतकऱ्यांना अनुदान वाटप करता आलेले नाही. शासनाकडून बदनापूर तालुक्यासाठी आणखी ७० कोटी रुपयांची आवश्यकता असून सदर निधी येताच या शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल नुकसानग्रस्त एक ही शेतकरी वंचित ठवण्यात आलेला नाही. -रमेश मुंडलोड, तहसीलदार बदनापूर

बातम्या आणखी आहेत...