आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:सरकार कोणाचेही असो, विकास थांबणार नाही

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील आहोत आणि यापुढेही राहू. सरकार कोणाचेही असो, मेडिकल कॉलेजप्रमाणेच इतर विकासकामांसाठी पाठपुरावा करू. मतदार संघात विकास कामे थांबू देणार नाही, अशी ग्वाही आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली.

विधान भवनात पोटतिडकीने पाठपुरावा करून जालना जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतल्याबद्दल मुस्तकिम हमदुले फाउंडेशन व चार्ली ग्रुपतर्फे आमदार गोरंट्याल यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुस्तकीम हमदुले, शेख शकील, फारूक तुंडीवाले, समाजसेवक शाकेर खान, आसिफ अंसारी, सय्यद शब्बीर, जालना विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष शेख वसीम, मोइज अन्सारी, गणेश चौधरी, अरुण घडलिंग, अतीक सेठ, मजहर मनियार, इम्रान चौधरी, नजीर अन्सारी, शेख अशरफ यांच्यासह परिसरातील नागरिक, काँग्रेसचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...