आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन:अपघात नव्हे, अ‍ॅड. लोखंडेंचा पत्नीनेच केला घात, 30 तारखेलाच किरण यांचा घेतला जीव, स्फोटाचा बनाव

कृष्णा तिडके | जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती गॅसच्या स्फोटात ३१ ऑगस्ट रोजी तरुण वकील किरण लोखंडे यांचा मृत्यू झाला. जिल्हा वकील संघाने हा अपघात नाही तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी तालुका जालना पोलिसांनी किरण यांच्या पत्नी मनीषा आणि अन्य दोघांविरोधात मंगळवारी रात्री ८:३० वाजता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी किरण यांचे आतेभाऊ दीपक रावसाहेब ठोंबरे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सोमवार व मंगळवारी लोखंडे यांची पत्नी व अन्य दोघांची कसून चौकशी केली. यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि ३०२ / २०१ / ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात पोलिसांकडून कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.

काय होती नेमकी घटना : अचानक स्फोटात झाला मृत्यू जालना शहरातील अयोध्यानगर भागात अर्चनानगर परिसरात किरायाच्या घरात वकील किरण लोखंडे राहत होते. ३१ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० वाजता घरगुती गॅसच्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. स्फोट इतका भीषण होता की लोखंडे यांचा जागेवरच कोळसा झाला. त्यांच्या पत्नीने आक्रोश केल्यानंतर शेजारील नागरिक व अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. याप्रकरणी सुरुवातीला तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. जिल्हा वकील संघाने या प्रकारावर संशय व्यक्त केला. हा अपघात नसून घातपात असू शकतो, असे सांंगत वकील संघाने थेट पोलिस अधीक्षकांना निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक संभाजी वडते यांच्याकडे सोपवला आहे. मात्र हा प्रकार घडून सहा दिवस झाल्यानंतरही पोलिस अद्याप ठोस माहिती गोळा करू शकलेले नव्हते.

हे सात प्रश्न पोलिस तपासात ठरले अत्यंत महत्त्वाचे 1 जिथे सिलिंडर होते त्या शेजारीच मृतदेहाची राख झाली. पेटल्यानंतर लोखंडे किमान घराबाहेरही का पडू शकले नाहीत? 2 मृतदेहाची जिथे राख झाली तिथे शेजारीच छोटेसे देवघर होते, त्याला कोणतीही झळ पोहोचली नाही? 3 लोखंडेंची दुचाकी राममूर्ती शिवारात कशी? 4 सिलिंडरचा स्फोट झाला असे सांगितले जात असले तरी, सिलिंडर सुरक्षित असल्याचे प्राथमिक पोलिस तपासातून दिसून येते. सिलिंडरमधून,गॅस गळती झालेली नाही, मग गॕॅस लीक कसा झाला? 5 दोन्हीही सिलिंडर आडवे पडले होते. एकाच वेळी दोन्हीही सिलिंडर कसे काय पडले? 6 अ‍ॅड. लोखंडे व त्यांच्या पत्नी या दोघांचाही मोबाइल अद्याप मिळालेला नाही. ते कुणी पळवले? 7 मृतदेह संपूर्ण जळाल्याने शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यामुळे गॅस गळती किंवा स्फोट होण्याची वेळ व लोखंडे यांच्या मृत्यूची वेळ यात तफावत आहे का?

दोन साथीदारांच्या मदतीने केला खून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण यांच्या पत्नी मनीषा यांनी त्यांच्या दोन साथीदारांच्या मदतीने ३० ऑगस्ट रोजीच किरण यांचा गळा आवळून खून केला. त्यानंतर दोन दिवस मृतदेह घरातच होता. मृतदेहाची दुर्गंधी वाढल्यानंतर मनीषा यांनी गॅसचा पाइप काढून स्फोटाचा बनाव केला. मृतदेह मात्र त्यांनी जाळला.

बातम्या आणखी आहेत...