आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:गोपीनाथ मुंडेंसारखे नेते होणे नाही

अंबड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील सोनदेव ग्राम पंचायत व जिल्हा परिषद शाळेत लोकनेते गोपीनाथ मुंढे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळेस सरपंच गजानन ढाकणे यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागात सर्वसामान्यांचे नेते म्हणून मंुडे साहेबाकडे पाहीले जाते. गल्ली ते दिल्ली असा त्यांचा प्रवास खूप कठीण आहे. कारण एका सामान्य कुटुंबातून एका छोट्या गावातून आणि एका छोट्या समाजातून महाराष्ट्रात नव्हे तर या देशांमध्ये स्वकर्तुत्वावर स्वतःचा ठसा उमटवणारे मुंडे साहेब हे एकमेव नेते आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या मनात ते आज सूद्धा जागृत आहेत. स्व. गोपीनाथ मुंढे साहेबा सारखे नेते पुन्हा होणे नाही.

असे ते म्हणाले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य समाधान ढाकणे, कैलास घेंबड, केशव घेंबड, अनिल माघाडे, शालेय समिती अध्यक्ष पंढरीनाथ मुंढे, उपाध्यक्ष संतोष सोळुंके, उद्धव ढाकणे,महादेव सोळुंके, सोपान काका शेजूळ, मुखध्यापक घाडगे, शिक्षक दलाला, हेगडकर, डोईफोडे, साबळे, ठाकरे, उकंडे, हरिभाऊ मुंढे अंबादास सोळुंके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच सर्व सामान्यांची कामे करणाऱ्या नेत्यांनी आम्हा कार्यकर्त्यांना वेळो वेळी कशी मदत केली अशा आठवणी यावेळी काढल्या.

बातम्या आणखी आहेत...