आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदर्शन:जिल्हा रुग्णालय जालना येथे पोषण प्रदर्शन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे बाहयरुग्ण विभागात पोषण सप्ताहांतर्गत पोषण प्रदर्शन भरवण्यात आले. उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्याहस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात सशक्त नारी, साक्षर बच्चा व स्वस्थ भारत यावर भर देवून प्रदर्शनीमध्ये एक पिरॅमिड, समतोल आहारामधील सर्व अन्नघटक प्रत्यक्ष मांडणी करून तसेच आहारात कोणत्या अन्नघटकांचा समावेश करावा, कोणती कमी प्रमाणात घ्यावीत व कोणत्या अन्नपदार्थांचा हळहळू वापर कमी करावा हे प्रत्यक्ष प्रदर्शनामध्ये सादर केले. गरोदर माता, स्तनदा माता, लहान मुले या वयोगटासाठी विविध प्रथिने, लोह युक्त पण कमी खर्चातील पौष्टिक पाककृती ठेवण्यात आल्या.

तसेच अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आपल्या निरोगी दिर्घायुष्यासाठी भारतीय ध्वजाप्रमाणे केशरी, पांढरा व हिरव्या रंगाच्या अन्नपदार्थाचा आहारात समावेश करून आपल्या आयुष्याचे कालचक्र २४ तास चांगले ठेवावे, असे आहारतज्ञ वसुधा पिंगळे यांनी सांगितले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी आहारातील पौष्टिकता वाढविण्याचे उपाय, मानवी जीवनात आपल्या आरोग्यासाठी संतुलित आहार पोषक तत्त्वाबरोबर किती महत्वाचा हे विशद केले. या सप्ताहात पोषण पुर्नवसन केंद्र यामध्ये स्तनदा व गरोदर मातेचा आहार, स्तनपानाचे महत्व, पूरक आहार, कमी खर्चातील पौष्टिक पाककृती यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. सदर कार्यक्रमासाठी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गायके, डॉ. घोडके, डॉ. घुस, डॉ. सोनखेडकर, डॉ. मेश्राम, आहारतज्ज्ञ वसुधा पिंगळे, नर्सिग स्कुलच्या प्राचार्य पार्वती लोडते, पुष्पा भालतिलक, मेवा कुंभार आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...