आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा कार्यक्रम:सतर्कता दिवसानिमित्त नेहरू युवा केंद्रात विद्यार्थ्यांना शपथ

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या नेहरू युवा केंद्र, जालना येथे सतर्कता दिवस/ सप्ताह घेण्यात आला. नेहरू युवा केंद्र जालना, औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना, युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना यांच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्था जालना येथे सतर्कता दिवस / सप्ताह घेण्यात आला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना सतर्कता दिवसाचे महत्व सांगून त्यांना मार्गदर्शन केले. सुरेश कदम सतर्कतेची शपथ दिली. यावेळी सुरेश कदम, डी. के. करंगळे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, वसंत सुर्वे, युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, वैभव पाटोळे, शेख अनिस, साहिल शेख, जय लोंढे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...