आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहणी:श्री काशीविश्वेश्वर मंदिराची; सुरंगळी येथील बारवेची तहसीलदारांकडून पाहणी

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सुरंगळी येथील श्री काशीविश्वेश्वर मंदिराला तहसीलदार सारीका कदम यांनी भेट देऊन मंदिर परिसर व बारवेची पाहणी केली.

जिह्यात ३७ इतिहास कालीन बारवाचे संवर्धन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम आढावा बैठकीत या जुन्या इतिहासकालीन बारवाचे जतन आणि संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तहसीलदार सारीका कदम यांनी श्री काशीविश्वेश्वर महादेव मंदिरातील बारवेची पाहणी केली असता मंदीर समितीकडुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आन्वा येथील मंडळ अधिकारी एकनाथराव सोनवणे, पेशकार विठ्ठल माळोदे, मगरे, सरपंच लक्ष्मीबाई दांडगे, उपसरपंच विनोद जाधव, ग्रामसेवक गणेश समिंद्रे, अंगणवाडी सेविका उषाताई खोंडे, काशी विश्वेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष संजय जाधव, उपाध्यक्ष काशीनाथ दांडगे, सचिव डॉ.संजीव पाटील, कोषाध्यक्ष मोतीराम दांडगे, विश्वस्त एकनाथ भराड, कौतीकराव जाधव, एकनाथराव टोपे, धनराज काळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...