आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती अर्पण‎:राजुरेश्वरचरणी पितळी धातूची मूर्ती अर्पण‎

श्रीक्षेत्र राजूर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्री राजुरेश्वरचरणी ७५‎ किलो पितळी धातूची मूषक मूर्ती‎ भोकरदन तालुक्यातील शेलूद‎ येथील जगन्नाथ बारोटे, प्रीती‎ बारोटे (दौड) या दांपत्याने निर्मला‎ दानवे यांच्या हस्ते शनिवारी अर्पण‎ केली.‎ गणपती पुळे मंदिराच्या धर्तीवर‎ राजुरेश्वर गणपती मंदिरास तसाच‎ मूषक अर्पण करावा, अशी इच्छा‎ जगन्नाथ बारोटे यांच्या मनात होती.‎

त्यानुसार शनिवारी जगन्नाथ बारोटे‎ यांच्या वाढदिवसाचे औचित्य‎ साधून निर्मलाताई दानवे यांच्या‎ हस्ते अभिषेक पूजा करून मूषक‎ मूर्ती अर्पण करण्यात आली.‎ सरपंच प्रतिभा भुजंग, शोभा‎ मतकर, माजी नगराध्यक्षा आशा‎ माळी, भाऊसाहेब भुजंग, सुधाकर‎ दानवे, रामेश्वर सोनवणे,‎ भाऊसाहेब काकडे, प्रशांत दानवे,‎ गणेश साबळे, विशाल ढवळे,‎ विनोद डवले, गजानन पुंगळे‎ आदींची उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...