आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअधिकाऱ्यांनी जबाबदारीने वागून सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांची कामे करावीत. आपसात समन्वय ठेवा, सर्वसामान्य लोकांची कामे वेळेत पूर्ण होत नसतील तर राजीनामे देऊन घरी बसा अशी ताकीद खासदार संजय जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली.
मंठा आणि परतूर तालुक्यातील विविध विकास कामांच्या संदर्भात मंठा तहसील कार्यालयात नुकतेच एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, परतूर तहसीलदार रूपा चित्रक यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला मंठा - परतूर तालुक्यातील सर्व विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते. खासदार जाधव यांनी कृषी विभाग, पंचायत समिती, बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, जलसंधारण विभाग, सहाय्यक निबंधक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, आरोग्य विभाग, वनीकरण, संजय गांधी निराधार योजनासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या वेळी मंठा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आकाश गोकणवार यांच्याकडून टंचाईग्रस्त गावांची माहिती घेतली असता त्यांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. तसेच तालुक्यातील पांदण रस्त्याच्या संदर्भात सुद्धा गटविकास अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आला. शिवसेना जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांनी पीक कर्ज देताना शेतकऱ्यांची पिळवणूक करू नये अशी अपेक्षा व्यक्त करून, ज्या बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी भूमिका मांडली. बँकेच्या अधिकाऱ्यांना सूचना देताना खासदार जाधव म्हणाले की, राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे बंधनकारक आहे.
शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली पाहिजे असे ते म्हणाले. या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब तेलगड, माधवराव कदम, अजय अवचार, अशोक आघाव, संजय राठोड, संतोष वरकड, सुरेश सरोदे, तुळशीराम कोहीरे, सुदर्शन सोळंके, माणिकराव थिटे, नगरसेवक अचित बोराडे, विकास सूर्यवंशी,अरुण वाघमारे, डॉ. संतोष पवार, बबन शेळके, पांडुरंग वैद्य, पप्पू दायमा, अण्णासाहेब सरकटे, विष्णुपंत खराबे यांच्यासह मंठा - परतूर तालुक्यातील विविध कार्यालयाचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.