आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुन्या पेन्शन:जुन्या पेन्शनची रक्कम एनपीएसमध्ये होणार जमा

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासन सेवेत १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून डीसीपीएस पेन्शन योजना लागू होती. मात्र, यात बदल करून एनपीएस देण्यात आली. दरम्यान, योजना बदलल्याने पूर्वीची रक्कम एनपीएसमध्ये जमा करण्याचे काम शिक्षण विभागाने हाती घेतले. याचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी गीता नाकाडे यांच्या हस्ते झाले.

शिक्षण विभागांतर्गत असलेल्या सर्व डीसीपीएस धारक शिक्षकांची माहिती एसएलआयपीवरून वरून तपासणी करून ऑनलाइन केली जात आहे. या सीएएमपी अंतर्गत २७५ शिक्षकांची माहिती ऑनलाइन करण्यात येणार आहे. याला सुरुवात करताच पाचनवडगाव केंद्रातील ७, पीर पिंपळगाव केंद्रातील १४, गोलापांगरी केंद्रातील १२ व कार्ला केंद्रातील १३ अशा ४६ शिक्षकांची रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग झाली.

बातम्या आणखी आहेत...