आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक कार्य:भोकरदन शहरात शुक्रवारी गौरव कर्तृत्ववान व्यक्तींचा ; अभिनेता मकरंद अनासपुरे असणार उपस्थित

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे माजी नगराध्यक्ष अॅड. हर्षकुमार जाधव यांच्या संकल्पनेतून भोकरदन मित्र मंडळातर्फे आयोजित गौरव कर्तृत्वाचा सत्कार सोहळ्याचे आयोजन ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता रत्नमला लॉन्स येथे करण्यात आले. या सोहळयास अभिनेता मकरंद अनासपुरे, सेवानिवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, निवृत्त जिल्हाधिकारी बी. जी. पवार, महाराष्ट्र-गोवा बार कॉन्सीलचे अध्यक्ष व्ही.डी. सोळंके, शेख सादिक अहेमद, ऋतुजा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या गौरव सोहळयात शहिद जवानांच्या पत्नींचे गौरव, एकल महिला मदत, प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव, महिला सशक्तीकरण, हुंडा बंदी, कन्या हाच हुंडा, व्यसनमुक्ती मार्गदर्शनासह प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...