आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात काही दिवसांपासून घडत असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या न्यायालयीन कामकाजासाठी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांची प्रतिज्ञापत्रे मोठ्या प्रमाणावर सादर करावीत, असे आवाहन पक्ष निरीक्षक महेंद्र इंदुलकर यांनी केले.
जालना येथील शिवसेना भवनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुुख रावसाहेब राऊत, शहरप्रमुख विष्णु पाचफुले, आत्मानंद भक्त, बाला परदेशी, बाबुराव पवार, सविता किवंडे, जावेद शेख, संतोष मोहिते आदींची उपस्थिती होती. इंदुलकर म्हणाले, पक्षाच्या माध्यमातून आपणास पद, सन्मानासह सर्व काही मिळते. परंतु संरक्षण देणारा एकमेेव पक्ष असून तो म्हणजे शिवसेना.
त्यामुुळे शिवसेनेचा विचार घराघरांपर्यंत पोहाचवा. मोठया प्रमाणावर पक्ष वाढवा. आजच्या काळात पक्ष अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असून पहिल्यांदाच पक्ष आपल्याला काही तरी मागत आहे. ते आपण प्रतिज्ञापत्र व सदस्य नोंदणीच्या पक्षास मदत करावी, असे आवाहन केले. जिल्हाप्रमुुख भास्कर अंबेकर म्हणाले, जिल्हा सातत्याने शिवसेनेच्या पाठीशी भक्कपणे उभा राहीलेला असून आजही जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर प्रतिज्ञापत्र भरुन सादर करीत आहेत.
जिल्ह्यात दोन लाखांवर शिवसेना सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू पाचफुले यांनी केले. बैठकीला ताराचंद जाधव, गोपाल काबलिये, सखाराम गिराम, घनश्याम खाकीवाले, संदीप झारखंडे, दुर्गेश काठोठीवाले, प्रभाकर घडलिंग, काशीनाथ जाधव, भगवान अंभोरे, दत्ता बंगाले, संतोष सलामपुरे, किशोर नरवडे, रविकांत जगधने, किशोर शिंदे, रमेश टेकूर, चेतन भुरेवाल, नरेश खुदभैये, कांतराव रांजणकर, रामकिसन कायंदे, बाबुराव कायंदे, नजीर शेख, सुशिल भावसार, प्रल्हाद फदाट, विजया चौधरी, राधा वाढेकर, दुर्गा देशमुुख, गंगुताई वानखेडे, मंजुषा घायाळ, संगिता नागरगोजे, मंग मिटकर, योगेश चिरखे, जनार्धन गिराम, गणेश लाहोटी, ज्ञानेश्वर सुपारकर, रामेेश्वर कुरिल, दशरथ सरकटे, बालाजी पवार, युवराज कुरिल, आकाश वैद्य यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.