आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोहळा:गावागावात शिवराज्याभिषेकदिनी शिवस्वराज्याची ‘गुढी’ उभारली; वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षण

दानापुरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील शिवस्वराज्य गुढी उभारण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिन शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात आला या कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती होती यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालय समोर शिवशंक राजदंड स्वराज्य गुडी उभारण्यात आली सरपंच शेख शकीलाबी मोबिन, उपसरपंच अनिल दादाराव शिंदे यांच्या हस्ते ही गुढी उभारण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, शेख जफर, शेख आजहर, अंबादास कनगरे, शेख जहीर, भगवान पाटील दळवी, रामेश्वर दळवी या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित होते. या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वेगवेगळे उपक्रम येथे राबविण्यात आले झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश गावकऱ्यांना देण्यात आला एस.डी. बावस्कर, ग्रामसेवक साहेब व ग्रामपंचायत सदस्य शेख जफर, यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षांची लागवड करण्यात आली आणि शिव स्वराज्य दिन मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला.

याप्रसंगी आरोग्य सेविका पांढरे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, जेष्ठ नागरिक, वरिष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते सतीशराव पवार, राम शिंदे, अंकुश पाटील दळवी, राजेंद्र पाटील दळवी, विठ्ठल पाटील दळवी, किशोर आढाव, सचिन पवार, अनिल शिंदे, शालेय समिती अध्यक्ष शेख जुबेर, भाऊसाहेब पवार, मनोज पवार, संजय शिंदे यांच्यासह ग्रामस्थांची यावेळी मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...