आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:शनिजयंतीनिमित्त भाविकांनी घेतला आमरसाचा महाप्रसाद; पळसखेडा मुर्तड येथे शनिजयंती उत्साहात साजरी

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​तालुक्यातील जागृत महादेवाचे देवस्थान श्री क्षेत्र नागेश्वर संस्थान पळसखेडा मुर्तड येथे शनैश्वर जयंती गंजीधर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शनेश्वराच्या मूर्तीस तैलाभिषेक, महापूजा व महाआरती करून उपस्थित पंचक्रोशीतील पाच हजार भाविकांना कुरडया पापडासह आमरस जेवणाचा महाप्रसाद देण्यात आला.

यावेळी श्री.क्षेत्र सताधार (गुजरातचे) महंत श्री.श्री.१००८ विजयजी बापू, वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची अध्यक्ष ज्ञानसिंधू संदिपान महाराज हासेगांवकर, वैराग्यमुर्ती ज्ञानेश्वर माऊली झोल, प्रकाश महाराज जंवजाळ, दिनकर महाराज थुट्ठे, मोरे महाराज यांच्यासह आमदार संतोष दानवे, निर्मला दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रकांत दानवे, जिल्हा परिषद सदस्य संतोष लोखंडे, रमेश पाटील गव्हाड, केशव जंजाळ, मनिषा जंजाळ, कानडजे, भाऊसाहेब पाटील, राजु म्हस्के, महादुशेठ राजपुत यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांची मोठी उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...