आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाटप:शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र वाटप

पिंपळगाव रेणुकाई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील कै.अण्णासाहेब देशमुख महाविद्यालय तसेच गजानन वाचनालय संस्थेच्या सयुक्त विद्यमाने शिवराज्याभिषेक सोहळाच्या निमित घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व रोख बक्षीस देण्यात आले.

छञपती शिवरायांनी अठरा पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन कशाप्रकारे स्वराज्याची उभारणी केली याबाबत मार्गदर्शन करीत संस्थेचे उपाध्यक्ष अरुण देशमुख यांनी आजच्या पिढीने देखील शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन जिवनाचे मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले. यावेळी बबनराव गाढे, प्राचार्य एस. डी. आपार, पांडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...