आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हक्काची लढाई:सातव्या दिवशी आंदोलन तीव्र, मराठा आरक्षणासाठी साष्टपिंपळगाववासीयांचा आत्मदहनाचा इशारा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावात मराठा समाजाचे प्राबल्य, पण सर्व समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
  • सातव्या दिवशी आंदोलन तीव्र, आता ग्रामस्थांकडून अन्नत्याग उपोषण

मराठा आरक्षणावर राज्य, केंद्र सरकार वेळकाढूपणा करीत असल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव हे अख्खे गावच उपोषणाला बसले आहे. पहिले सात दिवस समाजबांधवांनी आंदोलन केले. परंतु, अजूनही यावर निर्णय घेतला जात नसल्यामुळे बुधवारपासून आता गावकऱ्यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. कुणीच अन्न घेत नसल्यामुळे आरक्षणाचा प्रश्न आणखीच तीव्र होत चालला आहे. आरक्षण देण्यासाठी आता सरकारला गावातच यावे लागेल, नसता या ठिकाणीच नंतर आत्मदहनाचे पाऊल उचलणार असल्याचे गावकऱ्यांचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

शिक्षणात आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजातील तरुणांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे या गावातील ग्रामस्थांनी शिक्षण न घेण्याचाही ठराव घेतला आहे. चांगले गुण असूनही नोकरी मिळत नाही, हलाखीची कौटुंबिक परिस्थिती असतानाही फीस भरून शिक्षण घ्यावे लागत आहे. यामुळे साष्टपिंपळगावातील ग्रामस्थ अजूनच आक्रमक होत चालले आहेत. गेल्या आठवड्यापासून ग्रामस्थ शेतातील कामे न करता उपोषणाला बसून आहेत. ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी विविध गावांतून समाजबांधव येत आहेत.

गावात मराठा समाजाचे प्राबल्य, पण सर्व समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

या आंदोलनामुळे गाव अचानक राज्यात चर्चेत आले. प्रस्तावित कृषी कायदे रद्द करण्यासाठी ज्या प्रमाणे शेतकरी दीर्घ आंदोलनाला बसले आहेत. त्यापासून प्रेरणा घेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांची एकजूट असल्याने आंदोलनाने जोर धरला. त्यामुळेच साष्टपिंपळगाव या आंदोलनाचे केंद्रबिंदू बनले. शिवाय गावात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. पण असे असले तरी इतर समाजाच्या नागरिकांनीही याला पाठिंबा दिला.

बातम्या आणखी आहेत...