आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान:तिसऱ्या दिवशीही गारपिटीने झोडपले‎

जालना‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या‎ बेमोसमी पावसाने जालन्याच्या द्राक्ष‎ हबवर सडवा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने‎ द्राक्ष उत्पादक त्रस्त झाले होते. या संकटात‎ असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी बेमोसमी‎ पाऊस तसेच गारपिटीने जवळपास अर्धा‎ तास झोडपले. यामध्ये द्राक्षबागा पूर्णपणे‎ झोडपल्या गेल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे‎ मोठे नुकसान झाले.‎

जालना तालुक्यातील कडवंची तसेच‎ परिसरातील अंभुरेवाडी, धारकल्याण,‎ नाव्हा, नंदापूर, वडगाव वखारी आदी‎ गावांत द्राक्षबागेची मोठी शेती असून‎ मागील पंधरवड्यापासून वातावरणात‎ बदल होत असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा‎ प्रादुर्भाव वाढला हाेता. यावर नियंत्रण‎ मिळण्याचा प्रयत्न सुरू असताना मागील‎ तीन दिवसांपासून सुरू असलेल्या‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बेमोसमी पावसाची भर पडली.

द्राक्षांच्या‎ घडावर पडणाऱ्या पावसाचे स्थलांतर‎ होऊन नायट्राेजनचे प्रमाण वाढत आहे.‎ परिणामी द्राक्षांचे मणी फुटून सडवा‎ लागल्याने ७० टक्क्यांवरील उत्पादनाला‎‎‎‎‎‎‎‎‎‎ फटका बसला आहे. असे असताना‎ शनिवारी मोठ्या प्रमाणात बेमोसमी‎ पावसासह गारपीट झाली. यामध्ये‎ कडवंची, नदापूर, अंभोरेवाडी, नंदापूर,‎ धारकल्याण, भोरखेडी, न्हावा तसेेच‎ वरूड या गावांना फटका बसला. पाच ते‎ दहा रुपये किलो जाईल असा तरी माल‎ होता. शनिवारच्या गारपिटीमुळे पूर्णत: नष्ट‎ झाला असल्याचे कडवंची येथील‎ शेतकरी बालाजी कुदळे, उमा क्षीरसागर‎ यांनी सांगितले.‎

शंभर टक्के नुकसान‎
मागील पंधरा दिवसांपासून संकट सुरू‎ होते. शनिवारी कहर पाहायला मिळाला.‎ तब्बल अर्धा तास बोरांसारखी गारपीट‎ झाल्याने द्राक्षबागा पूर्णपणे नष्ट झाल्या‎ आहेत.‎ - नागेश अंभोरे, शेतकरी कडवंची‎

बातम्या आणखी आहेत...