आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई‎:एका आरोपीला अटक,‎ चार घरफोड्या उघड‎

जालना‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने‎ एका आरोपीला जेरबंद केले‎ असता, त्या आरोपीकडून चार‎ घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले‎ आहेत. आझादसिंग इच्छासिंग‎ तिलापितीया (गुरुगोविंदसिंगपुरा,‎ जालना) असे संशयित आरोपीचे‎ नाव आहे.‎ जानेवारी महिन्याच्या शेवटच्या‎ आठवड्यात जालना शहरातील‎ जुनी एमआयडीसी, भोकरदन‎ नाका, अंबड चौफुली, नूतन‎ वसाहत परिसरात चोऱ्या झाल्या‎ होत्या. या चोऱ्यांच्या अनुषंगाने‎ पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी‎ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस‎ निरीक्षक सुभाष भुजंग यांना आरोपी‎ अटक करण्याचे आदेश दिले होते.‎

या अनुषंगाने पथक तपास करीत‎ होते. आरोपींचा शोध घेत असताना‎ आझादसिंग तिलापितीया या‎ संशयित आरोपीने चोऱ्या केल्याची‎ माहिती मिळाली होती. या‎ माहितीच्या आधारे त्या आरोपीला‎ गुरुगोविंदसिंग नगर परिसरातून‎ ताब्यात घेतले. ही कारवाई सुभाष‎ भुजंग, पीएसआय प्रमोद बोंडले,‎ सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग‎ कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे,‎ सचिन चौधरी, योगेश सहाने, धीरज‎ भोसले, गोपाल गोशिक, प्रशांत‎ लोखंडे, पैठणे यांनी केली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...