आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रक-दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

वडीगोद्री4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रक-दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या धुळे सोलापूर महामार्गावरील गहिनीनाथनगर येथील कट पाॅईंटवर घडली.

धुळे-सोलापूर महामार्गांवरून गहिनीनाथ नगर येथील कट पॉईंट वरून ट्रकने भरधाव रस्ता ओलांडून सर्व्हिस रोडने महाकाळा येथून पाथरवाला खुर्द येथे जात असताना दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील सोमनाथ बप्पासाहेब डोईफोडे हे जागीच ठार झाले. तर बबन विठ्ठल साबळे हे गंभीर जखमी झाले आहे. या अपघातातील जखमीस रुग्णवाहिकेतून अंबड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...