आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघात:वाळू टिप्परच्या धडकेत एकाचा मृत्यू, तीन गंभीर, टेंभुर्णी-जाफराबाद रस्त्यावर भीषण अपघात

टेंभुर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नसोहळ्याचा मांडव घालण्यासाठी टेंभुर्णी येथील युवक जांभळीची डहाळे रिक्षातून घेऊन येत असताना वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने रात्री १०.३० वाजेच्या सुमारास रिक्षाला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टेंभुर्णी येथील एका लग्न सोहळ्यासाठी मंगळवारी सकाळी मांडव घालण्यासाठी अतिक सय्यद जाकीर सय्यद, अकबर कुरेशी, आसेफ आयुब पठाण, सय्यद मुजम्मिल सय्यद मेहबूब हे चौघे जण रिक्षाने डहाळे आण्यासाठी गेले होते. रात्री डहाळे परत घेऊन येत असताना टेंभुर्णी-जाफराबाद रस्त्यावर वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्परने रिक्षाला जोराची धडक दिली. यात अतिक सय्यद जाकिर सय्यद (१७, टेंभुर्णी) याचा जागीच मृत्यू झाला. तर अकबर कुरेशी महंमद कुरेशी (२२), अय्युब पठाण (२०), सय्यद जमील सय्यद अहमद (१७) हे जखमी झाले. जखमींवर टेंभुर्णीतील प्राथमिक रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर दोन जखमींना जालना येथे हलवले.

बातम्या आणखी आहेत...