आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजेक्शन:म्यूकरमायकोसिसवर उपचारांसाठी एक लाख इंजेक्शन खरेदी करणार, 30 कोटींची तरतूद : राजेश टोपे

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोेरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये म्यूकरमायकोसिसची लक्षणे दिसू लागली असून याचा उपचारांचा खर्चही मोठा आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून यावर मोफत उपचार केले जाणार असून लवकरच जीआर निघेल. तसेच यासाठी प्रारंभी ३० कोटींची तरतूद केली जाणार असून उपचारात लागणारे एक लाख अॅँफोटेरेसिन इंजेक्शन राज्य शासन खरेदी करणार आहे. यासाठी टेंडरही काढले आहे. शिवाय, तात्पुरत्या स्वरूपात पाच हजार इंजेक्शन खरेदी करून ज्या-ज्या ठिकाणी रुग्ण उपचार घेत आहेत, त्या ठिकाणी याचे वाटप करत असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी दुपारी आढावा बैठकीनंतर मंत्री टोपे पत्रकारांशी बोलत होते. म्यूकरमायकोसिस हा गंभीर आजार असून याचे तीन-चार टप्पे पडतात. सुरुवातीला चेहरा, ओठाच्या आतील हिरड्या, नाक, डोळे व त्यानंतर मेंदूपर्यंतही संसर्ग जातो. चेहऱ्यावर काळे डाग पडतात व त्यावर बुरशी चढते. अशा रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोठ्या हाॅस्पिटलचा समावेश करून तेथेच उपचार करण्यात येतील. तसेच मेडिकल कॉलेजची रुग्णालये, जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र वाॅर्ड स्थापन करून तेथेही उपचार केले जातील, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...