आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद भरती:यूपीएससी अर्जासाठी वन टाइम रजिस्ट्रेशन सुविधा ;  उमेदवारांना आता चुका टाळता येणार

जालना3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) उमेदवारांसाठी वन टाइम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म लाँच केला आहे. त्याच्या मदतीने परीक्षा फॉर्म भरताना उमेदवारांना चुका टाळता येतील. केंद्र सरकारमधील विविध पदांची भरती यूपीएससीमार्फत होत असते. यात सिव्हिल सर्व्हिस एक्झाम (सीएसई), नॅशनल डिफेन्स सर्व्हिस (सीडीएस), कंबाइंड मेडिकल सर्व्हिस (सीएमएस), इंजिनिअरिंग सर्व्हिस आदी परीक्षांचा समावेश आहे. पूर्वी या सर्वच परीक्षांसाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागत होते. त्यात चुका होण्याची शक्यताही जास्त होती. या पार्श्वभूमीवर आता यूपीएससीने वन टाइम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्मची सोय करून दिली आहे.

७० टक्के माहिती रेडिमेड उपलब्ध : वन टाइम रजिस्ट्रेशन केले की ‘ओटीआर’मध्ये उमेदवारांची ७० टक्के माहिती संबंधित परीक्षा फाॅर्ममध्ये आपोआप भरलेली असेल. उमेदवाराला फक्त संबंधित परीक्षेपुरतीच माहिती भरावी लागेल. त्यामुळे फॉर्म भरण्यासाठी वेळ कमी लागेल. अधिकृत वेबसाइट upsc.gov.in व upsconline.nic.in च्या होमपेजवर दिलेल्या ‘one Time Registration’ वर उमेदवारांनी माहिती भरून कागदपत्रे अपलोड करावीत.

बातम्या आणखी आहेत...