आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दीतील गणपती:आष्टी ठाण्याच्या हद्दीत 18 गावांत एक गाव एक गणपती

आष्टी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतूर तालुक्यातील आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आष्टीसह ४६ गावांत ११५ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना या वर्षी झाली आहे. त्यापैकी १८ गावांमध्ये “एक गाव एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे. या गावांतील मंडळांचे जिल्हाभरात कौतुक होत आहे.

गेली दोन वर्षे कोरोनाचे सावट असल्याने अनेक निर्बंधांमुळे गणेशोत्सव साजरा करता येत नव्हता. या वर्षी मात्र कुठलेही निर्बंध नसल्याने वाजतगाजत, थाटामाटात ३१ ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन होऊन गणेशोत्सव साजरा होत आहे. यामुळे गावागावात चैतन्य निर्माण झाले आहे. दरम्यान, आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आष्टीसह एकूण ४६ गावे येतात. या ४६ गावांत ११५ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली आहे. त्यापैकी आष्टी गावात २३ व ग्रामीण भागात ९२ अशा ११५ गणेश मंडळांची स्थापना झाली. त्यापैकी १८ गावांनी “एक गाव एक गणपती’ची स्थापना केली. शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीने बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.

या गावांत आहे “एक गाव एक गणपती’ : आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाणाची वाडी, चांगतपुरी, हास्तुरतांडा, कणकवाडी, लिखित पिंपरी, पिंपळी धामणगाव, पिंप्राळा, संकणपुरी, सातारा वाहेगाव, वडारवाडी, ढोणवाडी, सावरगाव, श्रीष्टी वाहेगाव, श्रीष्टी तांडा, अकोली, पांडेपोखरी व ब्राह्मणवाडी या १८ गावांत “एक गाव एक गणपती’ची स्थापना करण्यात आली आहे.

मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही लावणार
शुक्रवारी श्रीगणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी आष्टी पोलिस ठाण्याचे दोन अधिकारी, २८ कर्मचाऱ्यांसह १५ होमगार्ड तैनात असणार आहेत. तसेच प्रत्येक मिरवणूक मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार असल्याने अनुचित प्रकार टाळता येणार आहे.

मार्गदर्शक सूचनांचे पालन करा
सार्वजनिक गणेश मंडळानी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत शांततेत गणेशोत्सव साजरा करावा. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रत्येक मंडळाने पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वर्षाव करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. - शिवाजी नागवे, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे आष्टी.

बातम्या आणखी आहेत...