आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विक्रम मनडुरे यांची एचडीएफसी बँकेतून २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान ८० हजार ५६ रुपये वळते करून ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाली होती. सदर प्रकरणात तक्रारदारांनी तत्काळ जालना पोलिस ठाणे सायबर येथे संपर्क करून गुन्ह्यासंबंधाने माहिती दिली होती.
त्याअनुषंगाने २९ जानेवारी रोजी रात्री पोलिस ठाणे सायबर येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी तक्रारदारांनी दिलेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण केले. सदरची माहिती विविध पाेर्टलकडून प्राप्त करून घेऊन तक्रारदारांची रक्कम पुढे वळवण्यात आलेल्या त्या बँकेला तत्काळ पत्रव्यवहार करून संबंधित नोडल अधिकाऱ्यांंशी संपर्क केला. सदर रक्कम परत करण्याबाबत कळवले होते.
संबंधित बँकेला सतत पाठपुरावा करून तक्रारदारांची फसवणुकीद्वारे वळवलेली रक्कम ही २४ तासांच्या आत तक्रारदाराच्या खात्यामध्ये मूळ स्वरूपात परत प्राप्त झाली आहे. तक्रारदारांना पैसे लगेचच परत मिळाल्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. सदर कामगिरी पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस उपअधीक्षक इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे सायबरचे पोलिस निरीक्षक मारुती खेडकर, अंमलदार लक्ष्मीकांत आडेप, किरण मोरे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.