आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अल्पसंख्याक दिनानिमित्त ऑनलाइन प्रश्नावली स्पर्धा

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पसंख्यांक दिनाचे औचित्य साधून श्रीमती दानकुंवर महिला महाविद्यालयात ऑनलाइन सर्वांसाठी खुली प्रश्नावली तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत निबंध स्पर्धा घेण्यात आली.

प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षणमहर्षी स्व. कुंदनलालजी अग्रवाल व श्रीमती दानकुंवर माता यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महेंद्रकुमार गुप्ता तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय अग्रवाल, नरेश अग्रवाल, प्र.प्राचार्य विजय नागोरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. विद्या पटवारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. केशव सोळंके यांच्या संकलनातून एक चित्रफित दाखविण्यात आली.

वैष्णवी पिल्लेवाड, प्रा. साईलीला पारीक यांनी अल्पसंख्यांक दिनाचे महत्त्व सांगितले. उपप्राचार्या प्रा.डॉ.विद्या पटवारी यांनी आपल्या देशात अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती १९९२ मध्ये झाली पण आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. कुंदनलालजी अग्रवाल यांनी १९५२ मध्ये राष्ट्रीय हिंदी विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर ते एवढ्यावरच न थांबता शैक्षणिक दृष्ट्या त्या काळात मागास असलेल्या या जालन्यासारख्या अविकसित जिल्ह्यात मुलींसाठी केजी ते पीजी पर्यंतची शैक्षणिक संस्था चालू करून अल्पसंख्यांक संस्थेचे महत्वपूर्ण रोपटे लावल्याचे सांगितले. महेंद्रकुमार गुप्ता म्हणाले, आपले स्वतःचे काम जर प्रत्येकाने निष्ठेने केल्यास खऱ्या अर्थाने आपण विकासाभिमुख नक्कीच होऊ. त्यात आपणास कोणीही रोखू शकत नाही. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.डॉ. जितेंद्र अहिरराव, डॉ. झेड. बी. काजी, डॉ. स्वाती महाजन, डॉ. बी. जी. श्रीरामे, डॉ. अमोल खेडेकर, प्रा. बी. बी. खंडाळे, डॉ. लक्ष्मण कदम, प्रा. सीमा गुप्ता, प्रा. एस. जी. पटाईत आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...