आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवानगी:55 पैकी 14 ग्रामपंचायतींनीच घेतली होती प्रचाराची परवानगी

प्रल्हाद लाेणकर । जाफराबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१८ डिसेंबर रविवार रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रचाराची ग्रामीण भागात चांगलीच रणधुमाळी सुरू झालेली आहे. ५५ ग्रामपंचायतींपैकी केवळ १४ ग्रामपंचायतींनी प्रचारासाठीची रितसर परवानगी घेऊन प्रचार सुरू केला आहे.

५५ ग्रामापंचायतीपैंकी खानापूर व बुटखेडा, या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने सरपंचाच्या ५५ पैकी ५३ जागांसाठी १४५ तर सदस्यांच्या ४५१ जागांसाठी ७६५ इच्छूक निवडणूक आखाड्यात उतरलेले असुन आपल्या गटाचा सरपंच निवडून आणण्यासाठी जो तो कार्यकर्ता कामाला लागलेला असुन ग्रामीण भागातील विकासाचा कणा असलेली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आणण्यासाठी सर्वत्र रस्सीखेच सुरु आहे. प्रचारासाठी साम दाम दंड हे अस्त्र वापरुन प्रचारासाठी सोशल मिडीयाचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात आहे.

दरम्यान, निवडणुक आयोगाने उमेदवारांच्या प्रचारसभा, रॅल्या, प्रचारासाठी वाहन परवानगी, उमेदवारांचे तात्पुरते प्रचार कार्यालयासाठी परवानगी देण्यासाठी तहसिलकार्यालयात ९ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत वाहन निरीक्षक कासारे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार परवानगी कक्ष सुरु केला आहे. मात्र प्रचाराचा एक सप्ताह उलटुन देखील ५५ ग्रामपंचायतीपैकी केवळ १४ च ग्रामपंचायतींनी प्रचारासाठीची

या ग्रामपंचायतींनी घेतली परवानगी
प्रचारासाठी देऊळझरी, मंगरुळ, डोलखेडा, रुपखेडा, माहोरा,जानेफळ, यवता, हिवराबळी, कोळेगाव खासगाव चिंचखेडा यासह केवळ १६ ग्रामपंचायत इच्छुकांनी प्रचारासाठी परवानगी घेतलेली आहे. यासाठी वाहन निरीक्षक कासोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरटीओ मुख्यालयीन सहायक सी.एस.अग्रे, वनपाल व्ही.एच.पाटील,ग्रामसेवक सुरेंद्र भंडारी,एस.एल.सातपुते,संतोष गायकवाड,यु.बी.भालेराव हे कर्मचारी ९ डिसेंबर पासुन कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...