आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाची मदतीची घोषणा:अतिवृष्टीतील मदतीच्या केवळ याद्याच जाहीर ; शेतकऱ्यांनी बॅंकेकडे घेतली धाव

तळणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण तळणी मंडळात या खरीप हंगामात सतत अतिवृष्टी झाल्याने शासनाच्या वतीने मदतीची घोषणा करण्यात आल्यानंतर उशिरा का होईना तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना जाहीर झाली. या अनुदाच्या याद्या महसूल प्रशासनाने सोशल मिडीयावर प्रसारीत झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बॅंकेकडे धाव घेऊन अनुदानासदर्भात विचारणा करण्याचा तगादा लावला आहे.

वास्तविक पाहता दोन टप्यामध्ये असलेल्या अनुदानाचा पहिला टप्पा बँकेत महसुल प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या यादी नुसार वाटप करण्याचे काम दिवाळीपूर्वीच महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत सुुरुचालू झाल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्याचे अनुदान प्राप्त नसताना सुध्दा महसूल प्रशासनाने सोशल मिडीयावर दुसऱ्या टप्याच्या याद्या प्रकाशीत केल्याने बॅंक कर्मचार्याची डोकेदुखी वाढली असुन शेतकरी यादीवरचे नावे बघून सरळ बँकेत विड्रॉल करण्यासाठी तासनतास ताटकळत बसत आहे न आलेल्या अनुदानामुळे एक तर शेतकऱ्याचा वेळ जात आहे आणि बँक कर्मचाऱ्यांना नाहकचा मनस्ताप सहन करावा लागत आहे दूसऱ्या टप्याचे अनुदान प्राप्त नव्हते तर त्या याद्या महसुल प्रशासनाने का प्रसिध्द केल्या, असा सवाल विचारला जात आहे.

दरम्यान, अतिवृष्टी टप्पा एक व पीक विम्याचे वाटप शाखेत सुरु आहे. दुसऱ्या टप्याच्या अनुदानासदर्भात बॅंकेकडे कुठल्याच याद्या नाहीत तलाठ्याने दुसऱ्या टप्पाच्या याद्या जाहीर केल्याचे शेतकरी सांगत आहे. मात्र हे अनुदान येताच बँकेकडून कळवण्यात येईल, असे जिल्हा बँकेचे शाखा व्यवस्थापक राजेंद्रकुमार म्हस्के यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...