आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक वर्ष सुरू:पहिली ते सातवीला एकच पुस्तक, दप्तराचे ओझे झाले कमी

जाफराबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी यावेळी अनोखा प्रयोक करण्यात आला आहे. सात विविध विषयाची पुस्तके एकाच वेळी शाळेत नेण्याऐवजी ते संपूर्ण अभ्यासक्रमातील तीन भागात विभागणी करून एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. तसेच पुस्तक तयार करताना गणित आणि विज्ञान या विषयात ठिक ठिकाणी मराठी बरोबरच इंग्रजीतील संकल्पनांचाही वापर केल्याने विद्यार्थ्यांना आता विविध भाषिक पाठ्यपुस्तक या शैक्षणिक वर्षापासून उपलब्ध झाले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना तयार केली असून तिची अंमलबजावणी शैक्षणीक वर्ष २०२२ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे.

प्रमाणापेक्षा जास्त वजनाचे दप्तर वाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठ दुखी, मान दुखणे, डोके दुखणे, मानसिक त्रास हे सर्व टाळण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यानुसार पहिली ते सातवी या इयत्ता निहाय सर्व विषयांच्या आशयाचे एकत्रीकरण करून पाठ्यपुस्तकाचे तीन भाग तयार करण्यात आले आहे. हे भाग विद्यार्थ्यांना वार्षिक वेळापत्रकानुसार एक एक करून स्वतंत्रपणे शाळेत सोबत घेऊन जाता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बालभारती (मराठी) सुलभभारती (हिंदी) इंग्रजी, गणित आणि विज्ञान हे व्दिभाषिक तसेच इतिहास व नागरिकशास्त्र आणि भूगोल या विषयाची वेगवेगळी पुस्तके शाळेत नेण्या ऐवजी एकच पुस्तक शाळेत नेता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे नक्कीच कमी होणार आहे.

प्रथमच द्विभाषिक पुस्तके : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे यावेळी तीन भागातील पुस्तके उपलब्ध करून दिली असून सर्वच विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित केले जाणार आहे. इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयाच्या संदर्भात विविध संबोध, संकल्पना यांचे इंग्रजी व अर्थ समजावेत विषय सोपा वाटावा यासाठी मराठी शब्दांपुढे इंग्रजी शब्द देण्यात आले आहेत. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या भाषेतील काही मराठी शब्दांचे इंग्रजी भाषेतील शब्दही दिलेले आहेत. त्यानुसार आता गणित आणि विज्ञान या दोन विषयांचे स्वरूप आता द्विभाषिक झाले आहे. विद्यार्थ्यांनाही विषय सोपे हाणार आहे.

पहिली ते सातवीसाठी एकच पुस्तक
इयत्ता पहिली ते सातवीला आता सात ऐवजी एकच पुस्तक पुस्तक असून यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे होण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील सर्व शाळांना युडायस प्रमाणे सर्व शाळांना पाठ्यपुस्तके मिळाली पाहिजे या संदर्भात शासनाकडे आग्रही मागणी आम्ही आमच्या संघटने मार्फत केली आहे. तसेच या उपक्रमाबद्दल महाराष्ट्र शासनाचे आभार.
संदीप सोळंके, प्रहार शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना

दप्तराचे ओझे कमी होईल
सर्वशिक्षा योजनेअंतर्गत इयत्ता १ ते ७ वी पर्यतचे अल्पवयीन असल्याने त्यांच्या दप्तरांचे ओझे कमी व्हावे म्हणुन या विद्यार्थ्यांना द्विभाषिक मोफत पाठ्यपुस्तके देण्यात आली आहे. यामध्ये सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गाची पाच सहा पुस्तके न देता वर्षातील तिन भागातील पुस्तके विद्यार्थ्यांना पुरविण्यात आली आहे. तालुक्यातील इयत्ता १ ली ते ८ वी तील जिल्हा परीषद तथा शासन अनुदानित सर्व माध्यमांच्या १७७ शाळांमध्ये ८४ हजार ४०५ सर्व इतकी पुस्तके पुरविण्यात आली आहे.
वसंता शेवाळे, गटसमन्वयक जाफराबाद

बातम्या आणखी आहेत...