आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थव्यवस्था:..तरच अर्थव्यवस्था मजबूत होईल : दानवे

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अन्नधान्य, खते, विविध अनुदानाच्या योजना राबवताना जास्त दराने खरेदी करून अल्प दरात जनतेला उपलब्ध करून द्याव्या लागतात. काही राजकीय पक्ष वीज, पाणी फुकट देण्याच्या घोषणा करतात, याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. अनुदानाच्या योजनांत सरकारचा सहभाग राहणार नाही अशी व्यवस्था तयार करावी लागेल, तेव्हाच अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

जेईएस महाविद्यालयात आयोजित तीनदिवसीय मराठी अर्थशास्त्र परिषदेच्या ४५ व्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी परिषदेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. आर. बी. भांडवलकर हे होते. आमदार प्रताप अडसड, भास्कर दानवे, जेईएसचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, उपाध्यक्ष फुलचंद भक्कड, प्राचार्य डॉ. शिवनारायण बजाज, परिषदेचे कार्याध्यक्ष प्रोफेसर डॉ. अविनाश निकम, संचालक तथा कार्यवाह प्रोफेसर डॉ. दिलीप अर्जुने, खजिनदार डॉ. मारोती तेगमपुरे, अर्थसंवादचे संपादक डॉ.राहुल म्होपरे, माजी अध्यक्ष डॉ. अनिल सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...