आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:ओपीडीची वेळ सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत करा

जालना7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा सामान्य रुग्णालय आणि स्त्री रुग्णालयातील ओपीडी वेळेत बदल करत सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ओपीडी सुरू ठेवावी अशी मागणी शिवशाही प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम बाबासाहेब पिठोरे यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा महिला रुग्णालय येथे जिल्हा तसेच परजिल्ह्यातून रुग्ण येतात. मात्र येथील ओपीडीच्या वेळा विसंगत असल्याने बाहेरगावहून येणाऱ्या रुग्णांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. परगावचे रुग्ण सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्या दरम्यान पोहोचतात.

मात्र सकाळी ९ ते १२ ओपीडी ची वेळ असल्याने अनेक डॉक्टर १२ वाजेला घरी जातात. त्यामुळे रुग्णांना ताटकळत बसावे लागते. पुन्हा ४ वाजता डॉक्टर येतात, मात्र अनेकदा लांब पल्ल्याच्या बस गाड्या ४ ते ५ वाजेदरम्यान निघून जातात.

त्यामुळे गोरगरीब रुग्णांना रुग्णालयातच रात्र काढावी लागते. शिवाय त्यांना राहण्याची आणि भोजनाची कोणतीही सुविधा नसल्याने अनेकदा रुग्णालयाच्या आवारात हे रुग्ण झोपल्याचे आढळून येतात. अनेकदा दुपारी १२ वाजता ओपीडी ची वेळ संपल्याने रुग्णांना ताटकळत ठेवून डॉक्टर्स घरी जात असल्याचे प्रकारदेखील पहावयास मिळतात. अनेक रुग्णांना त्यांच्या रक्त, लघवीच्या चाचण्या, सोनोग्राफी, एमआरआय, सी टी स्कॅन चाचण्या करायच्या असतात.

बातम्या आणखी आहेत...