आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचय सभा:गरजू विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठाचे कार्य मोठे

परतूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक कारणामुळे ज्यांचे शिक्षण थांबले किंवा ज्यांना परत राहिलेले शिक्षण पूर्ण करायचे अशा गरजू विद्यार्थ्यांनसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठाचे कार्य महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. सदाशीव कमळकर यांनी केले .

परतूर येथील लालबहादूर शास्त्री महाविद्यालय अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्राद्वारे घेण्यात आलेल्या परिचय सभेच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. रवी प्रधान, डॉ.अर्जुन वायकर, प्रा. यशवंत दुबाले, केंद्र संयोजक डॉ. राजेंद्र फासे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ.कमळकर म्हणाले की , सुलभ प्रवेश प्रक्रिया ,अभ्यासक्रम निवडीचे स्वातंत्र्य, तज्ज्ञ प्राध्यापकांचे ऑनलाइन ऑफलाइन मार्गदर्शन त्यामुळे विदयार्थ्यांच्या सोयीनुसार हव्या त्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन विदयार्थांना आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करता येते . ज्ञान गंगा घरोघरी हे ब्रिद घेऊन हे विद्यापीठ काम करत आहे असेही शेवटी म्हणाले . प्रसंगी डॉ. अर्जुन वायकर ,प्रा. यशवंत दुबाले यांनीही परिचय सभेच्या अनुषंगाने आपले विचार व्यक्त केले . माजी विदयार्थी बाळासाहेब लुगाडे, नारायण नलावडे यांनी या विद्यापीठामुळे व या अभ्यासकेंद्रामुळे आपले राहिलेले शिक्षण कसे पूर्ण झाले यावर आपले अनुभव व्यक्त केले. तसेच उपस्थित सर्व विदयार्थ्याचा परिचय घेण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र संयोजक प्रा.डॉ. राजेंद्र फासे यांनी या अभ्यासकेंद्राद्वारे राबवल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाचा व काम करणाऱ्या समंत्रकाचा परिचय करून दिला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा . शरद बोराडे यांनी केले. आभार प्रा. राजेश सुसर यांनी मानले . कार्यक्रमास विदयार्थी , शिक्षकांची मोठी उपस्थिती लक्षणीय होती .

बातम्या आणखी आहेत...