आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुडाएस अपडेट करण्याबाबत विभागीय पातळीवरून पाठपुरावा सुरू आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांवर नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कामाला गती देण्यासाठी जालना तालुक्यातील ९७ शाळांच्या मुख्याध्यापकांची शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेत कानउघाडणी केली. एकही आधार पेंडिंग राहणार नाही असे काम करण्याच्या सूचना केल्या.
जालना तालुक्यातील विद्यार्थी आधार अपडेट्स प्रत्येक शाळेत ३० पेक्षा जास्त विद्यार्थी पेंडिंग आहेत, तसेच युडायस २०२२-२३ अपडेट यासाठी ९७ शाळा मुख्याध्यापक यांची बैठक जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे घेण्यात आली. या बैठकीत शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ, उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी एकाएका शाळेचे मुखध्यापक यांच्याकडून शाळेची स्थिती जाणून घेतली.ज्या शाळेचे ३० पेक्षा जास्त मुले अपडेट करणे बाकी आहेत, अशा शाळांना गटशिक्षणाधिकारी जालना यांना संबंधित मुख्याध्यापकना बैठकीतच नोटीस दिली.
तसेच शिक्षणाधिकारी यांनी कामे विहित वेळेत पुर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व संबंधित शाळेची आरटीई मान्यता रद्द करणे, व वैयक्तिक शासन मान्यता काढणे बाबत प्रस्ताव मागितले आहेत. त्याचप्रमाणे आजचे बैठकीत अनधिकृत गौरहजर मुख्याध्यापक, व पर्यवेक्षीय अधिकारी यांनाही नोटीस बजावण्याचे आदेशही दिले. विद्यार्थी आधार अपडेट संदर्भातील कार्यवाही ३० नोव्हेंबर पुर्वी होणे अपेक्षीत होते. या संदर्भात शाळेचे लाभाच्या योजना होणारे नुकसानीस शाळा जबाबदार राहणार आहे. अशी ताकीद शिक्षणाधिकारी यांनी दिली.
या बैठकीत वरिष्ठ कार्यालयास अपेक्षित योजनाची अंमलबजावणी संदर्भातही सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी गीता नाकडे, विस्तार अधिकारी अशोक साळुंके, बी. बी. काकडे, सर्व केंद्रप्रमुख, गटसमन्वयक पी. आर जाधव, साधनव्यक्ती, वि. शिक्षक अशी सर्व पर्यवेक्षीय अधिकारी यंत्रणातील अधिकारी यांचीही उपस्थिती होती. आधार अपडेट बाबत शाळांनी तत्काळ कार्यवाही करून जालन्याच्या नावे प्रलंबीत असलेली यादी शुन्यावर आणण्याचे आवाहनही यावेळी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.