आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांना संधी:मंठा तालुक्यातील 20 ग्रा.पं.वर  महिलांना संधी

मंठा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायत पैकी चार ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर रविवारी ३१ ग्रामपंचायतसाठी मतदान पार पडले. मंगळवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर अवघ्या अडीच तासात सर्व निकाल जाहीर करण्यात आले. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.परंतू निकालाची माहिती देण्यासाठी तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी तब्बल सहा तास उशीर लावला. निकालानंतर विजयी उमेदवारांचा तहसील परिसरात एकच जल्लोष पाहायला मिळाला.येथील तहसील कार्यालयात ३१ सरपंच आणि सदस्यांच्या मतमोजणीसाठी एकूण ९ टेबल लावण्यात आले होते. एकूण ११ फेऱ्यात मतमोजणी पार पडली. मतमोजणीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यावर्षी सरपंचाची थेट जनतेतून निवड होत असल्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आले होते. तालुक्यातील आंधवाडी, गुळखंड, कोकरंबा आणि रानमळा या चार ठिकाणच्या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून, पेठे भरवून आणि फटाक्यांची आतिषबाजी करीत आनंद साजरा केला.

अनेक विजयी सरपंचांनी सदस्यांसह आपापल्या गावात विजयी मिरवणूक काढण्यात आली. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी विजयाबाबत दावे - प्रतिदावे केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...