आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:नवोदय विद्यालयासाठी‎ 31 जानेवारीपर्यंत संधी‎

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‎वर्ष २०२२-२३ मध्ये इयत्ता‎ पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या व‎ जालना जिल्ह्यातील रहिवाशी‎ असलेल्या विद्यार्थ्यांनी जवाहर‎ नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी‎ नवोदयच्या संकेतस्थळावर सेवा‎ केंद्रावरून किंवा इतर माध्यमाद्वारे ३१‎ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज‎ करण्याचे आवाहन नवोदय‎ विद्यालय प्रशासनाकडून करण्यात‎ आले आहे.‎ या परीक्षेत विद्यार्थ्यांना सहभागी‎ होता यावे यासाठी जिल्ह्यातील सर्व‎ मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त‎ विद्यार्थ्यांचे नवोदय विद्यालय‎ प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सादर‎ करावेत, असे आवाहन परतूर‎ जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य‎ शैलेश नागदेवते यांनी केले आहे.‎

जवाहर नवोदय विद्यालय निवड‎ चाचणी २०२३ साठी इच्छुक‎ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज‎ भरण्यापूर्वी पाचवीच्या‎ मुख्याध्यापकांकडून प्रमाणपत्र‎ भरून घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्यांचा‎ फोटो, स्वाक्षरी व पालकांची‎ स्वाक्षरी करून हे प्रमाणपत्र‎ मुख्याध्यापकाद्वारे सत्यापित करणे‎ आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म‎ भरण्यासाठीची जाहिरात,‎ माहितीपत्रक, सुधारित प्रमाणपत्र हे‎ नवोदयच्या संकेतस्थळावर उपलब्ध‎ आहेत. याचा लाभ घेण्याचे‎ आवाहन करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...