आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहार:अपहार करणाऱ्या लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश

जालना9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात जमा केलेल्या दंडाच्या रकमेतील १८ लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या जालना नगरपालिकेच्या प्रभारी लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी काढले आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी फिरताना सामाजिक अंतर न ठेवणे, मास्क न वापरणे याबाबत दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. उल्लंघन करणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात होता. यानुसार प्रभारी लिपिक संतोष अग्निहोत्री यांना पावती पुस्तक व चलन पावती देण्यात आली होती. यात ४२ लाख ७२ हजार ४४० रुपयांचा दंड वसूल झाला होता. रोखपाल यांच्याकडे केवळ २४ लाख ४० हजार रुपये जमा झाले होते, परंतु १८ लाख ३२ हजार ४४० रुपये पालिकेत जमा झाले नव्हते. रक्कम भरण्याबाबत मुदत देऊनही रक्कम न भरली गेल्याने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांनी काढले आहेत.

बातम्या आणखी आहेत...